बहुजन समाज पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पिंपरी येथे माता सावित्रीमाई फुलेंना विनम्र अभिवादन करण्यात आले.
पिंपरी चिंचवड:आज दिनांक ०३ जानेवारी 2021 रोजी बसपा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने सावित्री माई फुलेंना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी बहुजन समाज पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष सुरज गायकवाड यांच्या हस्ते सावित्रीमाई फुलेंना पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी सुनील चटोले (उपाध्यक्ष बसपा पिंपरी चिंचवड शहर) गौतम गायकवाड (उपाध्यक्ष,पिंपरी चिंचवड शहर) राजेंद्र पवार (सचिव,पिंपरी चिंचवड शहर) धम्मदिप लगाडे (कोषाध्यक्ष, पिंपरी चिंचवड शहर) चंद्रकांत सोनवणे (पिंपरी विधानसभा अध्यक्ष) सिद्धार्थ वन्साळी (महासचिव, पिंपरी विधानसभा) बसपा जेष्ठ नेते बलराज कटके, बसपा जेष्ठ नेते बाबासाहेब सरोदे, युवा नेते राजन ससाणे, नागेशभाऊ, विजय शिंदे, तसेच बसपा महिला आघाडीच्या नेत्या विद्याताई जाधव, शिल्पाताई गायकवाड, संगीताताई पवार, व बसपाचे मिशनरी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महापुरुषांच्या घोषणा देऊन महापुरुषांच्या विचारांचा जयजयकार करण्यात आला..

