बाजारात तुफान गर्दी : पोलीस ॲक्शन मोडमध्ये, या शहरात 45 ठिकाणी कडक बंदोबस्त

0 झुंजार झेप न्युज

बाजारात तुफान गर्दी : पोलीस ॲक्शन मोडमध्ये, या शहरात 45 ठिकाणी कडक बंदोबस्त

अमरावती : राज्यात कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, संचारबंदीच्या नियमाला हरताळ फासला जात आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी तुफान गर्दी पाहायला मिळाली. आता याला लगाम घालण्यासाठी पोलीस अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. आजपासून शहरात 45 ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 एप्रिल पर्यत कडक संचारबंदी लागू केली आहे. या संचार बंदी दरम्यान मात्र अत्यावश्यक सेवाना सरकार ने सूट दिली आहे. पण आता याच अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अमरावती शहरात विनाकारण फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांच्या मुसक्या आवळण्यासाठी आता पोलीस अॅक्शन मोडमधे आलेले आहे. शहरात होणारी गर्दी लक्षात घेता अमरावती शहराच्या पोलीस डॉ. आरती सिंग यांनी निर्देश आणखी कडक केले असून आता अमरावती शहरात पोलिसांचा कडक पहारा लावण्यात आला आहे. 

अमरावती शहरात येणाऱ्या प्रत्येक मार्गावर नाकाबंदी केली जाणार आहे. शहरातील तबल 45 ठिकाणी पोलिसांचे पॉईंट नेमण्यात आले आहे. सातत्याने तिथे पोलीस राहणार आहे. शहरात फिरणाऱ्या नागरिकावर लक्ष आरपीसी पथक हे पेट्रोलिग करणार आहे. तसेच 30 नोव्हेंबरपर्यत 67 पोलीस अधिकारी, 1420 पोलीस कर्मचारी आणि 250 होमगार्ड हे गस्तीवर असणार आहे. या दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाईचा ईशारा पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यानी दिला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.