14 एप्रिल परमपूज्य महामानव विश्वरत्न डॉ: बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती.
14 एप्रिल परमपूज्य महामानव विश्वरत्न डॉ: बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते या जयंतीच्या निमित्ताने सर्व बहुजन वर्ग डॉ: बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती फार उस्तवात व थाटामाटात साजरा करत असतात परंतु याच जयंतीच्या दिवशी डॉ: बाबासाहेब आंबेडकर यांचे रक्त व नातू प्रकाश (तथा) बाळासाहेब आंबेडकर यांच्या संगे जयंती साजरी करण्याची जी संधी मला मिळाली व त्याच दिवशी देशातील मोठ-मोठे उद्योजक राजकारणी सर्व जाती धर्माचे लोक फक्त बाळासाहेब यांचा आशीर्वाद घेण्यासाठी जे धडपड करत होते हे मी स्वतः अनुभवलं व याच पवित्र दिवशी बाळासाहेब आंबेडकर माझ्या आग्रहखातीर एका वडार समाजाच्या झोपडीत जेवायला येणे व जेवण करणे म्हणजे हे वडार समाजासाठी अभिमानस्पद व योगायोगच म्हणावे लागेल मी नेहमी म्हणत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कशी असतील तर एक उत्तम उदाहरण म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सारखेच असतील आणि हे सिद्ध झालं मी आंबेडकर घराणे बरोबर काम करतो हे माझं भाग्यच म्हणावे लागेल जय शिवराय जय भिम

