फोटो काढणं बेतलं जिवावर, वालदेवी धरणात ६ जणांचा बुडून मृत्यू! मृतांमध्ये ५ मुलींचा समावेश!

0 झुंजार झेप न्युज

 पाण्यात उभं राहून फोटो काढण्याचा प्रयत्न जिवावर बेतल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.

नाशिक:एकीकडे करोनामुळे होणारे मृत्यू पाहण्याची वेळ राज्यावर रोज येत असताना नाशिकमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. नाशिकच्या वालदेवी धरण परिसरात आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या ९ मुला-मुलींपैकी ६ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत या सगळ्यांचे मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, रात्री उशीर झाल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले. शनिवारी सकाळी सर्व ६ जणांचे मृतदेह सापडले आहेत. पाण्यात उभं राहून फोटो काढताना पाय घसरल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

नेमकं झालं काय?

लॉकडाऊनमुळे नाशिकमध्ये सर्वत्र हॉटेल, रेस्टॉरंट बंद होते. त्यामुळे सोनी गमे (१२ वर्षे) या आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिचे मित्रमैत्रिणी थेट वालदेवी धरण परिसरात गेले. त्यांनी सोबत केक देखील नेला होता. मात्र, यावेळी सेल्फी काढण्याच्या नादात त्यापैकी एकाचा पाय घसरला. त्याला वाचवण्यासाठी इतरांनीही पाण्यात उड्या टाकल्या. यामध्ये आरती भालेराव (२२), हिम्मत चौधरी (१६), नाजिया मनियार (१९), खुशी मणियार (१०), ज्योती गमे (१६) आणि सोनी गमे (१२) या सहा जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले समाधान वाकळे, प्रदीप जाधव राहणार सिंहस्थनगर आणि सना नजीर मणियार राहणार पाथर्डी फाटा हे तिघे जण सुदैवाने बचावले आहेत.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.