देशी दारूचे एकूण 8 बॉक्स किंमत 40000 रुपयांचे चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने घेऊन जात असताना मिळून आले आहे.
औरंगाबाद:पाचोड पोलिसांची कारवाई (किशोर धायकर पैठण प्रतिनिधी) दिनांक 15/04/2021 रोजी संध्याकाळी ठीक सात वाजेच्या सुमारेस अडुळ गावाजवळ औरंगाबाद येथील शेख मुबारक शेख हैदर यांनी त्यांच्याकडील रिक्षा मध्ये देशी दारूचे एकूण 8 बॉक्स किंमत 40000 रुपयांचे चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने घेऊन जात असताना मिळून आले आहे, सदर कारवाई ए पी आय सुरवसेसाहेब, पी एस आय खरडसाहेब पोलीस नाईक संतोष चव्हाण, प्रशांत मुळे, पवन चव्हाण यांनी केली, दारुसह एकूण एक लाख 40 हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त केला आहे, व आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास सुरु आहे, श्रीमती मोक्षदा पाटील व एस पी भामरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे

