वंचित बहुजन महिला आघाडीच्या कार्यकर्त्या रेणुका जाधव यांचा मदतीचा हात.

0 झुंजार झेप न्युज

वंचित बहुजन महिला आघाडीच्या कार्यकर्त्या रेणुका जाधव यांचा मदतीचा हात.

मुंबई,दि.२५ - मुंबईसह राज्यात कॊरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक सामाजिक संस्था, विविध पक्षाचे कार्यकर्ते आपापल्यापरिने लोकांची मदत करीत आहे. अश्याच एका महिलेने रात्र दिवस रुग्णाची सेवा करून अनेकांना जीवदान दिले आहे. या आहेत नालासोपारा येथील वंचित बहुजन महिला आघाडीच्या कार्यकर्त्या रेणुका जाधव. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

वंचित बहुजन महिला आघाडीच्या वसई विरार महानगर पालिका सचिव रेणुका जाधव यांच्याकडे असंख्य लोकांचे मदतीसाठी फोन येत असतात. रात्री अपरात्री ते आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन मदत करायला जातात. मग ती मदत त्यांच्या कार्यकक्षेच्या बाहेर असली तरी ते मागे हटत नाही. सध्याच्या कॊरोना काळात कोणाला व्हेंटिलेटर तर कोणाला ऑक्सिजन बेड तर कोणाला प्लाझ्मा पाहिजे असतो, तर अनेकजण हॉस्पिटलचे बिल कमी करण्यासाठी त्यांच्याकडे फोन करीत असतात. अश्या वेळी कोणतीही वेळ न पाहता रेणुका जाधव आपली टीम घेऊन निघतात. मीरा रोड ते वसई, विरार परिसरात ते रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मदत करीत असतात. संतोष पाते नावाच्या रुग्णाचे बिल त्यांनी ६८ हजार रुपयांनी कमी करून दिले, तर अनेकांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड मिळवून दिला. असे अनेक उदाहरणे देता येतील. त्यांच्याकडे सर्व रुग्णालयांची यादी, फोन नंबर तसेच कोविड नियंत्रण कक्षाशी संपर्क असल्याने कोणत्या परिसरात, कोणत्या रुग्णालयात किती बेड खाली आहेत, याची सविस्तर माहिती त्यांच्याकडे असते. अनेकांना फोनवरून तर काहींना प्रत्यक्षात भेटून त्यांचे हे कार्य चालू असते. रेणुका जाधव म्हणजे वसई विरार भागातील एक चालते फिरते मदत केंद्र झाले असून कॊरोना काळात त्यांची ही मदत मोठा हातभार लावत आहे. हे काम करीत असताना त्यांना त्यांच्या कुटुंबाकडेही लक्ष देता येत नाही. अश्याही परिस्थिती मध्ये वंचितची ही रणरागिणी लोकांना सेवा देत आहे. पालघर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेखा अवचार, वसई विरार शहर अध्यक्ष प्रवीण गायकवाड तसेच रेणुका जाधव यांचे पती नालासोपारा पूर्व वार्ड अध्यक्ष सचिन जाधव, वसई पुर्व कार्यकर्त्या दिलिशा वाघेला,

नालासोपारा पुर्व वॉर्ड सचिव जितू परमार, महिला कार्यकर्त्या नुरी अंसारी हे सर्व वंचितचे कार्यकर्ते, पदाधिकारी रेणुका जाधव यांच्या कामात मदत करतात. रेणुका जाधव यांच्या या कामाचे अनेकांनी कौतुक केले आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.