कटोरा घेऊन उदयनराजे रस्त्यावर, तर सातारचा दुसरा खासदार गहू काढण्यासाठी शेतात!

0 झुंजार झेप न्युज

साताऱ्यातील दोन खासदारांच्या दोन तऱ्हांची चांगलीच चर्चा रंगली आहे.

सातारा: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढल्याने महाराष्ट्रात लॉकडाऊनची अंमलबजावणी होण्याची दाट शक्यता आहे. या सगळ्या परिस्थितीमध्येही साताऱ्यात मात्र दोन खासदारांच्या दोन तऱ्हा पाहायला मिळत आहेत. भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले  यांनी शनिवारी साताऱ्यातील पोवईनाक्यावर लॉकडाऊनविरोधात आंदोलन केले. हातात कटोरा घेऊन ते फुटपाथवर आंदोलन करत होते. मात्र, त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेतील खासदार श्रीनिवास पाटील यांनी हा वेळ शेतीची कामे उरकण्यासाठी सत्कारणी लावला. 

वीकेंड लॉकडाऊनमुळे शनिवारी आणि रविवारी लोक श्रीनिवास पाटील यांना भेटायला येणार नाहीत. त्यामुळे श्रीनिवास पाटील यांनी स्वत:च्या शेतात गहू काढणीचे काम हाती घेतले. त्यानंतर साताऱ्यातील दोन खासदारांच्या दोन तऱ्हांची चांगलीच चर्चा रंगली आहे.

उदयनराजे भोसले यांनी लॉकडाऊनला यापूर्वीच पूर्णपणे विरोध दर्शविला होता. व्यापारी असतो तर जग इकडे तिकडे झाले असते तरी मी दुकान उघडे ठेवले असते. लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही, असे उदयनराजे भोसले यांनी ठणकावून सांगितले होते.

सध्या वातावरणात अनेक व्हायरस आहेत. त्यामुळे कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. लोकांनी पहिल्या लॉकडाऊनवेळी ऐकले. आता लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. व्यापाऱ्यांनी कामगारांचे पगार कसे भागवायचे? सणासुदीचे दिवस असल्यामुळे व्यापाऱ्यांनी कर्ज काढून माल भरला आहे. उद्या बँका हप्ते भरण्यासाठी व्यापाऱ्यांच्या मागे लागतील. त्यामुळे दुकानातील कामगारांना लस द्यावी. कामगारांना लस देऊनही दुकाने उघडण्यास परवानगी मिळत नसेल तर व्यापारी कसे ऐकणार, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.