आकाश अप्पासाहेब शेलार हा तरुण चापाणेर येथील धरणावर मित्रासोबत पोहायला गेला होता.
औरंगाबाद : मित्रासोबत पोहायला गेलेल्या तरुणाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तरुणाला पाण्यात बुडून जीव गमवावा लागला. औरंगाबाद जिल्ह्यातील चापाणेर गावात ही घटवा घडली.आकाश अप्पासाहेब शेलार हा तरुण चापाणेर येथील धरणावर मित्रासोबत पोहायला गेला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (शनिवारी) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.
धरणाच्या पाण्यात उडी घेण्याचा मोह
आकाश पहाटे साडेसहा वाजताच मित्रासोबत धरणावर गेला होता. धरणातील पाणी पाहून त्याला पोहण्याचा मोह आवरता आला नाही. म्हणून त्याने पाण्यात उडी मारली. मात्र धरणात मोठ्या प्रमाणात खोलीकरण झाल्यामुळे त्याला पाण्याचा अंदाज आला नाही.
उपचारासाठी नेताना प्राण सोडले
आकाश बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर साधारण अर्ध्या तासाने त्याला पाण्याबाहेर काढण्यात आले. त्याला उपचारासाठी कन्नड येथे नेले जात असताना रस्त्यातच त्याने प्राण सोडले.
बीडमध्ये तिघा जीवलग मित्रांचा मृत्यू
बीड शहरापासून जवळ असलेल्या पांगरबावडी शिवारात पोहायला गेलेल्या तीन जिवलग मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच समोर आली होती. तिघे मित्र पोहण्यासाठी खदानीमध्ये गेले होते. मात्र, तिघांचाही बुडून मृत्यू झाला.ओम जाधव, मयूर गायकवाड, श्याम देशमुख अशी मृत मुलांची नावे आहेत. हे तिघेही बीड शहरातील गांधीनगर भागातील रहिवासी असल्याची माहिती आहे.

