गोदावरीत बेकायदेशीर नैसर्गिक पाण्याचा प्रवाह रोखून तयार केला रस्ता ... संबंधीतावर कारवाई करण्याची मागणी.
विहामांडवा | (किशोर धायकर पैठण प्रतिनिधी) - तालुक्यातील हिरडपुरी येथील गोदावरी नदी पात्रात मुरूम टाकून रस्ता तयार करण्यात आला . या रस्त्याला ग्रामस्थांचा विरोध आहे . वाळू वाहतूक करण्यासाठी बेकायदेशीर पाण्याचा नैसर्गिक प्रवाह रोखून रस्ता तयार केला करण्यात आला असून याच रस्त्यावरून वाळूची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे . सदरील रस्ता नष्ट करण्यात यावा . रस्ता तयार करणाऱ्याचा शोध घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून हिरडपुरी येथे वाळू चोरी सुरू होती . महसूल व पोलीस प्रशासनाला कार्यवाही करता येऊ नये . तसेच कारवाई करण्यासाठी महसूल पथक आल्याची माहिती मिळताच वाळू चोरी बेकायदेशीर रित्या केलेल्या रस्त्याने सुरळेगाव ता गेवराई हद्दीत पळून जातात . गेवराई तालुक्यातील सुरळेगाव येथून अधिकृत वाळूचा लिलाव झालेला आहे . हायवा वाहनाद्वारे हिरडपुरी गावातून वाळूची वाहतूक होत आहे . गेवराई तालुका हद्दीतील वाळू उपसा करून ही वाळू हिरडपुरी गावातून पैठण तालुक्यात सोन्याच्या भावाने विकली जाते. या अवैद्य वाळू वाहतुकीमुळे हिरडपुरी गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे व गावातील रस्ता खचून गेला आहे . त्यामुळे
गोदावरी नदीपात्रातील नैसर्गिक पाण्याचा प्रवाह रोखून तयार केलेला मुरूमाचा रस्ता बंद करण्यात यावा . अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे .
नदीचा नैसर्गिक प्रवाह अडविणे बेकायदेशीर आहे. त्वरित याबाबत माहिती घेऊन ग्रामदक्षता समितीस सदर अडथळा काढून टाकण्याच्या सूचना देण्यात येत आहे .

