डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शांतता बैठकीचे आयोजन
विहामांडवा(किशोर धायकर पैठण प्रतिनिधी): पाचोड पोलिस ठाण्याचे वतीने आज दि.12/4/2021 रोजी सांयकाळी 5 वाजे दरम्यान विहामांडवा ग्रामपंचायत येथे सर्व समाज बांधवांची व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच पत्रकार बांधव व जयंती चे अध्यक्ष उपाध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या अनुषंगाने पाचोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली गणेश सुरवसे यांनी विहामांडवा गावातील ग्रामपंचायत मध्ये सर्व समाजाची व व्यापाऱ्यांची बैठक घेऊन योग्य त्या सविस्तर सुचना दिल्या, व कोरोणा संबंधित शासणाने प्रारीत केलेल्या सुचनाचे पालन करण्याचे आव्हान केले, व शासनाच्या नियमाचे पालन न करणाऱ्या वर गुन्हे दाखल करू तसेच विहामांडवा येथील जयंती चे अध्यक्ष उपाध्यक्ष व व्यापारी यांनी आम्ही सर्व नियमांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करु,असे आवाहन केले, त्यावेळेस विहामांडवा पोलीस चौकी चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोरक्षनाथ खरड सहाय्यक फौजदार संजय मदने व आप्पासाहेब माळी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते यावेळी विहामांडवा ग्रामपंचायत कडून पाचोड पोलीस स्टेशनचे नवनियुक्त गणेश सुरवसे (सहायक पोलिस निरीक्षक) यांचे स्वागत केले.

