विनापरवाना कोविड सेंटर चालवणं महागात पडलं, नवजीवन हॉस्पिटलवर जिल्हा शल्य चिकित्सकांची कारवाई

0 झुंजार झेप न्युज

खासगी रुग्णालयाला कोविड डेडिकेट रुग्णालय चालवण्याची परवानगी नसताना वाशिम शहरातील नवजीवन हॉस्पिलनं 20 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. 

वाशिम: जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून,शासकीय रुग्णालयात बेड खाली असताना रुग्ण खाजगी रुग्णालयात धाव घेत असल्याचं चित्र आहे. खासगी रुग्णालयाला कोविड डेडिकेट रुग्णालय चालवण्याची परवानगी नसताना वाशिम शहरातील नवजीवन हॉस्पिलनं 20 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी आज कारवाई केली. संबंधित हॉस्पिटलला नोटीस बजावण्यात आली आहे. यानंतर कोविड रुग्ण दवाखान्यात न घेण्याची तंबी देण्यात आली आहे.

रुग्णालयात कोरोनाचे 20 रुग्ण

वाशिम शहरात नवजीवन हॉस्पिटलमध्ये कोविडचा विनापरवाना नसताना कोरोना रुग्णावर इलाज सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या पथकानं रुग्णलयात पाहणी केली असता कोरोनाचे 20 रुग्ण आढळून आले. त्यामुळं बॉम्बे नर्सिंग अँक्ट नुसार रुग्णालयाचा परवाना रद्द का करू नये, अशी नोटीस देण्यात आली असल्याचे डॉ. मधुकर राठोड यांनी सांगितले. नवजीवन हॉस्पिटलमध्ये निमोनियाचे रुग्ण आहेत. आज जिल्हा शल्य चिकित्सक यांनी भेट दिली. आम्ही कोविड सेंटरची परवानगी घेतली नव्हती. आम्ही आज कोविड सेंटरची परवानगी साठी फाईल पाठविली असल्याचं नवजीवन हॉस्पिटलचे डॉक्टर डॉ. अस्लम शेख यांनी सांगितलं आहे.

वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही कोरोनाचा कहर

वाशिम जिल्ह्यात कोरोनाचे 488 रुग्ण आढळले आहेत तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 262 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 37 दिवसात एकूण 55 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, मागील 12 दिवसात 3423 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण:19383

सद्यस्थितीत ऍक्टिव्ह रुग्ण :2422

आतापर्यन्त डिस्चार्ज दिलेले रुग्ण:16749

आतापर्यंत एकूण मृत्यू :211

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.