कंत्राटदारांनी इमारतीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले होते.

0 झुंजार झेप न्युज

 कंत्राटदारांनी इमारतीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले होते.

भाटनगर बौद्धनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत 1991 -1992चे दरम्यान 17 बिल्डिंगचे काम पूर्ण होऊन नागरिकांना सुपूर्त करण्यात आले होते. परंतु कंत्राटदारांनी इमारतीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले होते. त्याचा परिणाम कालांतराने इमारतीची पडझड चालू झाली. इमारतीचे टेरेस गळत आहेत तसेच पायऱ्या तुटलेले आहेत. त्यामुळे बहुजन समाज पार्टी पिंपरी चिंचवड शहर च्या वतीने सहाय्यक आयुक्त व अभियंता यांना दुरुस्तीसाठी निवेदन देण्यात आले. परंतु महानगरपालिकेतर्फे त्या निवेदनाची योग्य दखल घेतली जात नसून महानगरपालिका व स्थानिक निवडून दिलेले प्रतिनिधी या विषयांमध्ये दखल घेत नाहीत व येथील नागरिकांकडे दुर्लक्ष करत आहे.भविष्यात काही कारणाने या इमारतीत काही दुर्घटना घडली तर त्या सर्वस्व महानगरपालिका जबाबदार असेल.म्हणून बौद्धनगर येथील सर्व नागरिकांना कळकळीची विनंती आहे या विषयांमध्ये नागरिकांनी दखल घेऊन बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.