ऊसतोडणी हंगामा नंतरच्या कामगारांच्या- मुकादमांच्या व्यथा......
हंगामी गुलामगिरीच्या दुष्ट चक्रात आडकलेला ऊसतोड कामगार नरक यातना भोगत आहे. हंगाम संपल्यानंतर उर्वरित बाकी असलेली रक्कम तात्काळ जमा करा म्हणत अनेक ऊसतोड कामगारांची कुटुंबे डांबूने ठेवलेले आहेत. आज बुलढाणा जिल्ह्यातील काही कुटुंब एका मुकादमाने ओलीस ठेवले होते. परंतु प्रत्यक्ष गेल्यानंतर तिथे भयान वास्तव पाहून मुकादम हा सुद्धा या व्यवस्थेनं पिचलेला एक सगळ्यात मोठा घटक आहे याची जाणीव झाल्याशिवाय राहिली नाही.
त्या ऊसतोड कामगारांना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी आपल्या गावी जायचे होते परंतु मुकादम त्यांना जाऊ देत नव्हता. आम्ही प्रत्यक्ष जाऊन मुकादमाशी चर्चा करू त्या कामगारांना जयंतीसाठी गावाच्या दिशेने रवाना केले.
पण तरीही हे दुष्टचक्र संपवण्यासाठी योग्य कामाचा योग्य मोबदला हाच पर्याय आहे, ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर राजकारण करणाऱ्या नेत्यांना आणि त्यांच्या रक्ताच्या मेहनतीवर स्वतःचे इमले बांधणाऱ्या कारखानदारांना जाणीवपूर्वक होऊ द्यायचे नाही याची अनुभूती मागच्या संपात आली आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ऊसतोड कामगारांचा, मुकादमांचा व वाहतूकदारांचा लढा उभा करून ऊसतोडणी प्रकारातील सर्व घटकांना त्यांचा हक्क मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही.

