राज्यात कोरोनाने अक्षरशः हाहाकार माजवलाय राज्यात सर्वत्र वैद्यकीय सुविधांचा.
राज्यात कोरोनाने अक्षरशः हाहाकार माजवलाय राज्यात सर्वत्र वैद्यकीय सुविधांचा जसे की रेमडेसिवीर इंजेक्शन्स, बेड्स, अॉक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधांचा तुटवडा निर्माण झालाय. सरकारने या सर्व सुविधांची उपलब्धता करून देण्याऐवजी सरकार व त्यांचे जबाबदार मंत्री रोज लाईव्ह येवुन घाबरवण्याचे काम करत आहे. अशा वाईट परिस्थिती मध्ये राज्यातील जनतेला धीर देण्याऐवजी लॉकडॉऊन लावणार, निर्बंध लावणार असे रोज रोज धमकावून अस्वस्थता निर्माण करत आहेत. आज पर्यंत राज्यसरकारने राज्यातील जनतेला ना कुठले पॅकेज जाहीर केला ना कुठली आर्थिक मदत केली त्यामुळे आता जर लॉकडाउन लावत असाल तर आधी शेतकरी, हातावर पोट असलेले कामगार, छोटे व्यापारी, मच्छिमार किंवा इतर कामगार असतील या सर्वांचा विचार माननीय मुख्यमंत्र्यांनी करून त्यांच्या खात्याच कमीत कमी दहा हजार रूपये टाकावे आणि नंतरच लॉकडाउन लावावा.

