उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर यांनी जंबो कोविड हॉस्पिटलला भेट देत नागरीकांचे प्रश्न लावले मार्गी.
पुणे:गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना आपत्तीमुळे रुग्णांचे होणारे हाल,जंबो कोविड रुग्णालयातील सोयी सुविधांचा अभाव,बेडची उपलब्धता,जेवणाचा सुमार दर्जा या प्रश्नांवर पुण्याच्या *उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर* यांनी अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांना बोलवून घेत जंबो कोविड रुग्णालयास भेट दिली.या वेळी बेडची स्थिती जाणून घेवून बेड वाढविण्याची तसेच ऑक्सीजन बेड व वेंटीलेटर वाढविण्याचे आदेश त्यांनी प्रशासनास दिले तसेच जेवनाविषयीच्या नागरिकांच्या तक्रारी जाणून घेत स्वता जेवन केले आणी संबंधित अधिकारी वर्गास सूचना केल्या.झोपडपट्टयांमधील वाढते रुग्णांचे प्रमाण लक्षात घेवून ताबडतोब सहाय्यक महापालिका आयुक्तांनी पालिकेच्या शाळा व वास्तू ताब्यात घेवून विलगिकरण कक्ष बनवावेत अशी सूचना दिली.या वेळी बोलताना अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी जंबो कोविड रुग्णालयातील सोयी सुविधा वाढवण्यावर तसेच वेंटीलेटर व ऑक्सिजन बेड वाढवणार आहे असे प्रतिपादन केले.शहरातील एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेवून सर्वच रुग्णालयांस धडक भेट देणार असुन नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे असे सूतोवाच उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर यांनी केले.

