युवा कामगार सेनेच्या वतीने हजारो लोकांनाअन्नदान
पिंपरी चिंचवड:-पिंपरी चिंचवड येथील विभागीय कार्यालय कमलेश पोरवाल बिल्डिंग या ठिकाणी गरीब ,कष्टकरी, असंघटीत कामगारांना काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे.हाताला काम नाही .त्यामुळे उदरनिर्वाह कसा करायचा हा कामगारांच्या पुढे पडलेला गंभीर प्रश्न आहे. अशा या कोविंड महामारी च्या संकटाच्या काळामध्ये सर्वसामान्य मजुरांची व्यथा जाणून कामगार युवा सेनेच्या वतीने गरजू लोकांना अन्नदान करण्याचा निर्णय युवा कामगार सेनेच्या वतीने घेतला आहे.

