भीम जयंती साधेपणात साजरी भीमसैनिकातून नाराजी.......
कळंब तालुका (राजेंद्र ओव्हाळ कळंब ता.प्रतिनिधी).. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची आज 130 वी जयंती मौजे कोथळा साजरी करण्यात आली. परंतु साधेपणाने जयंती साजरी करण्यास भीमसैनिकामधून नाराजी व्यक्त होत आहे. देशासह जगभरात कोरणा रोगाच्या प्रभावाला आळा घालण्यासाठी व सरकारकडून जनतेच्या संरक्षणासाठी लॉकडाउन विषयी वेगवेगळे निर्बंध टाकण्यात येत आहेत.राज्यात संचारबंदी व जमावबंदी यासारख्या निर्बंधामुळे भीमसैनिकांना भीम जयंती साधेपणाने साजरी करावी लागत आहे.
भीम जयंतीला तमाम भीम सैनिकांच्या आनंदाला पारावार उरत नसते. परंतु गेल्या वर्षी देखील भीम जयंती उभ्या जगावर कोरोनाचे संकट असल्यामुळे सरकारच्या आदेशानुसार साधेपणात साजरी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे यावर्षी पण भीम जयंती साधेपणात सादर करावी लागत असल्यामुळे भीम जयंती जल्लोषात सरकारच्या आदेशानुसार साजरी करता येत नसल्यामुळे भीम सैनिकांच्या मनातून नाराजी व्यक्त होत आहे.यावेळी विजय ओव्हाळ ,जीवन ओव्हाळ,प्रवीण ओव्हाळ,दत्ता ओव्हाळ,अविनाश ओव्हाळ,सुंदर ओव्हाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते

