बेकायदेशीर तिक्रमण करून वडिलोपार्जित शेती बळकावणार्यांवर कठोर कारवाई करा
पुणे सोमनाथ जाधव माण तालुका मुळशी जिल्हा पुणे येथील सर्वे नंबर 52 ऑब्लिक 2 ब क्षेत्र 60.7 आर मधील वडिलोपार्जित मिळकतीवर श्री मोहन मारुती रिसवडकर यांनी बेकायदेशीर अतिक्रमण करून मिळकत बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. सदर जमीन आमची चुलत बहीण नामे मालन शिवाजी इरले गेली चाळीस ते पन्नास वर्ष वडिलोपार्जित शेती करत आहे. माझे वडील कै.नामदेव रामा जाधव यांना दारू पाजून दारूच्या नशेत सदर मिळकत हिराबाई अशोक खोले यांनी बनावट कागदपत्राच्या सह्या च्या आधारे बनावट खरेदी खत करून बळकावण्याचा प्रयत्न केला आहे .सदर प्रकरण हे पुणे न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे .हिराबाई अशोक खोले यांनी बेकायदेशीर ताबा घेण्यासाठी भाडोत्री गुंडाचा वापर करून आमच्यावर दबाव टाकत असून आम्हाला जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे. अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून आम्हाला संरक्षण देऊन, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी रमेश जाधव यांनी केली आहे.

