बहुजन मुक्ती पार्टीचे मुख्यमंत्र्यांना पत्र आणि मुख्यमंत्र्यांकडून लाॅकडाऊन काळात जनतेसाठी दिलेली मदत...

0 झुंजार झेप न्युज

 बहुजन मुक्ती पार्टीचे मुख्यमंत्र्यांना पत्र आणि मुख्यमंत्र्यांकडून लाॅकडाऊन काळात जनतेसाठी दिलेली मदत...

 

बहुजन मुक्ती पार्टी चे प्रदेशाध्यक्ष मा.बाळासाहेब मिसाळ पाटील यांनी दि०९/०४/२०२१ रोजी पत्र लिहुन मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती.व त्या पत्रामध्ये त्यांनी मुख्यमंत्री यांनी राज्यात लाॅकडाऊन लावले तर महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेचा पोटापाण्याचा प्रश्न मार्गी लावावा.तसेच राज्यातील गरीब लोकांना अर्थात भटके विमुक्त,अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्याक,गरीब ओबीसी रेशनिंग च्या माध्यमातून व्यक्ती 20 किलो धान्य देण्यात यावे .तसेच मजुर लोकांना प्रती व्यक्ती प्रती दिन ५०० रूपये मजुरी देण्यात यावी...

या प्रमुख मागण्यांसह अनेक मागण्या केल्या होत्या.मुख्यमंत्र्यांकडून ज्याबाबी केल्या त्या बर्याच पैकी त्या पत्राचा आधार घेऊन केल्या आहेत.जसे की मजुर लोकांना प्रत्येकी १५०० रूपये देणे .व गरीब लोकांना मोफत ३ किलो गहु व २ किलो तांदूळ वाटप करणार असले बाबत ही त्यानी घोषणा केली आहे .या सर्व मागण्या पाटील साहेबांनी केल्या होत्या .पंरतु मुख्यमंत्र्यांकडून त्या पुर्ण पणे लागु झाल्या नाहीत फक्त काही प्रमाणात लागु करणार आहेत शिधापत्रिका संदर्भात जे हमीपत्र भरून घेण्यात येत होते.त्या संदर्भात ही

 मा.बाळासाहेब मिसाळ पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण महाराष्ट्रामध्ये हमी पत्र जलाओ अभियान राबवण्यात आले होते परंतु एक दिवस अगोदरच म्हणजे १एप्रिल रोजी दुपारी ३वाजता सरकार व्दारे परिपत्रक काढुन ती मोहीम थांबवण्यात आली आणी लाखो गरीबांना दिलासा मिळाला.

वरील दोन्ही गोष्टीवरून एक गोष्ट लक्षात येते की सत्तेच्या बाहेर राहुन देखील बहुजन मुक्ती पार्टी आज लोकहिताची अनेक कामे यशस्वीपणे करत आहे.किंवा बहुजन मुक्ति पार्टी च्या हालचाली दखल घेतलीहजात आहे तसेच बहुजन मुक्ति पार्टी कडून काही गोष्टी शिकत आहेत..!

लोकहिताची दूरदृष्टी हीच मा.बाळासाहेब मिसाळ पाटील यांची ओळख आहे.!

1)मा. व्हि.एल मातंग BMP राष्ट्रीय अध्यक्ष

2)मा.बाळासाहेब साहेब मिसाळ पाटिल प्रदेश अध्यक्ष

3) मा.राहुल जी मखरे राष्ट्रीय महासचिव BMP

4)सुमिताताई पाटील मँडम राष्ट्रीय उपाध्यक्ष BMP

5)मा.सुजाता चौंदते मँडम प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी BMP

6)मा.सुनिल (काकासाहेब) जाधव कार्यकारणी सदस्य युवा आघाडी BMP

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.