उस्मानाबाद मध्ये सव्वा कोटीचा गांजा जप्त,पोलिसांची कारवाई!

0 झुंजार झेप न्युज

 आरोपींवर विविध कलमानुसार गुन्हा दाखलकडब्याच्या गांजित ठेवला होता ४७ पोती गांजाआरोपीच्या मेव्हण्याच्या शेतात लपून ठेवला होता गांजा?

उस्मानाबाद /कळंब तालुका: जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकत ४७ पोती गांजा जप्त केला असूून त्याची किंमत अंदाजे रक्कम तब्बल सव्वा कोटी इतकी आहे. परंतु या गुन्ह्यातील दोन आरोपी फरार झाले आहेत. दरम्यानस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कामगिरी बद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे. 

कडब्याच्या गांजित ठेवला होता ४७ पोती गांजा

सदर प्रकरणातील २ आरोपी फरार झाले असून, आरोपींचे नाव बालाजी छगन काळे , राजेंद्र छगन काळे असे आहेत. दरम्यान, आरोपींनी ४७ गांजाचे पोते हे एका कडच्या गंजीत नेऊन ठेवले होते. सदर कडब्याची गंज ही रोडपासून खूप आत मध्ये असल्याने याकडे कोणाचेही लक्ष जात नव्हते. मात्र, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून ४७ गांजाचे पोते जप्त केले आहेत.

नेमकं काय आहे हे प्रकरण?

स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक पांडुरंग माने यांना एका खबरऱ्याद्वारे मसा खंडेश्वरी शिवारात गांजा लपून ठेवला असल्याची माहिती मिळाली. सदर माहिती मिळाल्यानंतर पांडुरंग माने यांनी ही माहिती आपल्या वरिष्ठ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निरीक्षक घाडगे यांना कळवली. दरम्यान यानंतर पोलीस अधीक्षक राहतील एक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली गांजाच्या लपवून ठेवलेल्या ठिकाणी धाड मारण्याचे ठरवले. पोलिसांनी ३१ मे रोजी ५ वाजता मसा खंडेश्वरी येथे कडब्याच्या गंजीवर धाड टाकून ४७ पोती गांजा जप्त केला.

आरोपीच्या मेव्हण्याच्या शेतात लपून ठेवला होता गांजा?

दरम्यान कळंब तालुक्यातील मसा खंडेश्वरी या शिवारात आरोपी असलेल्या बालाजी छगन काळे , राजेंद्र छगन काळे यांची १५ एकर जमीन असून, या जमिनीच्या बाजूला सदर आरोपींचे मेहुणे बालाजी शिंदे यांची देखील शेती आहे. सदर आरोपीच्या मेव्हण्याची शेतीदेखील आरोपीच करतात. आणि या शेतामध्येच कडब्याच्या गंजीत इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा लपवून ठेवला होता. ज्याची किंमत १ कोटी २४ लाख ५९ हजार इतकी आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.