धूम्रपान करणाऱ्यांवर भरारी पथकाद्वारे कारवाई करा- जिल्हाधिकारी अमोल येडगे

0 झुंजार झेप न्युज

• एड्स प्रतिबंध, गर्भलिंग निदान कायदा व राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रमाचा आढावा

यवतमाळ दि. 11 ऑक्टोबर : सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवन व धूम्रपान करण्यास शासनाने कोप्टा ॲक्ट-2003 च्या कायद्यान्वये मनाई केली असून नागरिकांच्या सुरक्षीत आरोग्यासाठी व कायद्याविषयीच्या जनजागृतीसाठी त्यांना विविध माध्यमांद्वारे तंबाखूचे दुष्परिणाम समजावून सांगावे तसेच तहसिल कार्यालय, नगरपरिषद, प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस विभाग व शिक्षण विभाग इ. विविध शासकीय कार्यालयामार्फत एकत्रितपणे भरारी पथक नेमून मोठ्या आस्थापना, बस स्टँड, शासकीय कार्यालये इ. सामुहिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण, गर्भलिंग निदान करण्यास प्रतिबंध कायदा व राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रमाचा आढावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज महसूल भवन येथे घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी, डॉ. रमा बाजोरिया, डॉ. मनिष देशमुख, डॉ. बोरीकर, जिल्हा आयसीटीसी पर्यवेक्षक प्रिती दास, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम, किरण ठाकरे इ. प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांनी शासकीय कार्यालयात देखील सुंदर माझे कार्यालय अभियानांतर्गत तंबाखुमुक्त कार्यालय असे उपक्रम राबविण्याबाबत व शालेय विद्यार्थ्यांमार्फत त्यांचे पालकांना तंबाखुचे दुष्परिणामाची जाणीव करून देण्यासाठी विविध उपक्रमाद्वारे आवाहन करण्याचे सांगितले.

नुकत्याच शाळा सुरू झाल्या असून शालेय विद्यार्थिनींना राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रमांतर्गत दर आठवड्याला आर्यन, फॉलीक ॲसिडच्या गोळ्या शिक्षकांमार्फत प्राधाण्याने वितरीत करण्यााचेही निर्देश त्यांनी दिले.

एड्स बाबत नागरिकांचे गैरसमज दूर करून त्यांना मोफत्‍ उपचाराची माहिती देण्याबाबत व एड्स प्रतिबंधाकरिता मोठ्या प्रमाणात रक्त नमुने तपासणी करण्याचे तसेच विविध रुग्णालयात रक्ताचा तुडवडा जाऊ नये यासाठी प्रत्येक तालुका, शाळा व कॉलेजमधील युवकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्याचे त्यांनी सांगितले.

स्त्रि-भ्रृण हत्या थांबविण्यासाठी नर्स, आशा, अंगणवाडी सेविका इ. मार्फत भरारी पथक नेमून गर्भातील लिंगाचे परिक्षण करण्यास प्रतिबंध करणे तसेच कायद्याचे उल्लघन करणाऱ्या केंद्राची माहिती हेल्प नाईन नंबर 1800-233-4475 देणाऱ्याला त्याचे नाव गुप्त ठेवून १ लक्ष रुपये पर्यंत बक्षीस देण्यात येत असलेली बाबीची सर्वदूर प्रसिद्ध करण्याचेही जिल्हाधिकारी येडगे यांनी बैठकीत सांगितले.

बैठकीला रविंद्र कोल्हे, विणा खांगवीकर, आरोग्य, शिक्षण, पोलीस, इ. विभागाचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.