घटस्थापने पासून जेजुरी खंडोबा मंदिर दर्शनासाठी खुले
पुरंदर,(पुरंदर प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरी येथील खंडोबा मंदिर घटस्थापनेच्या [७ आक्टोंबर]या शुभ मुहर्तावर शासनाच्या निमावली नुसार भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे.
मार्तंड देवस्थानच्या वतीने मुखदर्शनासाठी सोशलडिस्टींग चे पालन करुन रांगेतून दर्शन देण्यात येणार असून व स्वंयचलीत सँनिटायझर चे बुथ निर्माण करण्यात आले आहेत.दिवसातून चार ते पाच वेळा जंतू नाशक फवारणी केली जाणार असून भाविकांनी देखील येताना मास्कचा वापर करावा.सोशलडिस्टींगचे पालन करुन मंदिर प्रशासनास सहकार्य करावे.
