दोन दिवसीय गडचिरोली दौऱ्यासाठी राज्यपालाचे नागपूर येथे आगमन

0 झुंजार झेप न्युज

दोन दिवसीय गडचिरोली दौऱ्यासाठी राज्यपालाचे नागपूर येथे आगमन

नागपूर,दि.11 : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर-गडचिरोली जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी आज सकाळी 10:30 वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाले. सोमवारी दुपारीच ते हेलिकॉप्टरने गडचिरोलीला रवाना होणार आहेत.

राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी गडचिरोली येथे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासह विविध सामाजिक संस्थांना ते भेटी देणार आहेत. तसेच विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

आज विमानतळावर आगमन झाल्यानंतर नागपूर महानगरपालिकेचे महापौर दयाशंकर तिवारी, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी विमला आर., महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज कुमार सूर्यवंशी, नागपूर ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, पोलीस उपआयुक्त बसवराज तेली, राजशिष्टाचार अधिकारी जगदीश कातकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.

उद्या मंगळवारी गडचिरोली येथील कार्यक्रम आटपून ते नागपूरला पोहचणार आहेत. उद्या मंगळवारी दुपारी 3:30 ला ते विमानाने ते मुंबईकडे प्रयाण करतील.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.