आमदार निधीचा पहिला निधी कर्मभूमीत देऊ शकलो हे माझे मोठे भाग्य- आमदार अमित गोरखे

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी चिंचवड मधील काळभोर नगर मोहननगर , भागाची विजेच्या लपंडवापासून कायमची सुटका

पिंपरी चिंचवड,दि.17: अंधारातून प्रकाशाकडे ..कधी काळी याच भागात आधारात ,दिव्याखाली मी अभ्यास केला ,काकडी विकली आणि आता आमदार झाल्यांनतर माझा पहिला विकास निधी मला याच भागाला देता आला जिथं मी घडलो त्या भागातील विकासासाठी मला काम करता आले हे मी माझे भाग्य समजतो .अशा भावना आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केल्या .निम्मित होते ते या परिसरातील ३० च्या ऐवजी ६० केव्हीचे २ ट्रान्सफार्मर आमदार अमित गोरखे यांच्या आमदारनिधीतून पिंपरी चिंचवडमधील मोहननगर , काळभोरनगर भागाला देण्याच्या भूमिपूजन समारंभ पारपडले.   

वर्षानुवर्षे मोहननगर ,काळभोर नगर मधील नागरिक मागणी करीत असलेल्या नवीण व अत्याधुनिक विजेच्या ट्रांसफार्मर ची मागणी करीत होते .या मागणीची दखल घेत आमदार अमित गोरखे यांनी आपल्या आमदार निधीतून ट्रांसफार्मर बसविण्यात येत आहे .यावेळी आमदार अमित गोरखे यांनी आपल्या शालेय व बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला .तसेच या पुढे आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण परिसराचा विकास करण्याचे आपले स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले . 

या भूमीपूजन समारंभाला उपस्थितां मध्ये पिं.चिं.मनपा.मा. नगरसेविका अनुराधा ताई गोरखे,मा.नगरसेवक राजू दुर्गे, भाजपा शहर पदाधिकारी कैलास कुटे,गणेश लंगोटे, वैशाली काळभोर, विशाल काळभोर, मारुती भापकर, मनीषा शिंदे,दिलीप दातीर पाटील, दत्ता देवतरसे, विष्णू चावरिया,संजय जगताप, भास्कर पुणेकर, तुळशीराम काळभोर, मिनल यादव, रवि नामदे, राहुल बोरकर,राम दातीर,प्रशांत थरकुड़े,संदीप बामने, प्रसाद हिरणवाळे,भाई भोसले,तुषार नामदे,कमलेश मुथा, नितिन चिलेकर,कमलेश लुंकड या सह पिंपरी चिंचवड परिसरातील नागरिक व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.