भोसरीत भाजपाला गळती ;आमदारांना धक्का

0 झुंजार झेप न्युज

भाजपच्या माजी नगरसेविका सारिका लांडगे व संतोष लांडगे राष्ट्रवादीत दाखल

- विद्यमान आमदारांच्या कार्यशैलीविरोधात भोसरीकरांनी दंड थोपटले

- पदाधिकारी, माजी नगरसेवकांच्या गळतीचे ''रिफ्लेक्शन' निवडणुक निकालात दिसेल 

- महाविकास आघाडीच्या नेत्यांचा विश्वास

भोसरी,दि.07: भोसरीतील माजी नगरसेविका सारिका संतोष लांडगे व संतोष लांडगे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये सारिका लांडगे यांनी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या काळात हा भाजप आणि विद्यमान आमदार महेश लांडगे यांना मोठा धक्का मानला जात आहे. 

भोसरीचा गड या पंचवार्षिकमध्ये ढासळताना पाहायला मिळत आहे. यापूर्वी भाजपचे लक्ष्मण सस्ते, भिमाबाई फुगे आणि आता सारिका लांडगे यांच्या माध्यमातून भाजपला मोठी गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. सारिका संतोष लांडगे यांनी बुधवारी यमुनानगर निगडी येथे महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. 

सहा महिन्यापूर्वी भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये असणारे चित्र महाविकास आघाडीचे भोसरी विधानसभेचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी पूर्णतः पालटून टाकले आहे. एकतर्फी वाटणारी भोसरी विधानसभेची निवडणूक अजित गव्हाणे यांनी अक्षरशः रेस मध्ये आणून ठेवली आहे. पदयात्रा, रॅली, भेटीगाठी यामध्ये अजित गव्हाणे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विरोधकांना धडकी भरलेली असताना पक्षाला लागलेली गळती एक प्रकारे विद्यमान आमदारांना मोठा धक्का मानला जात आहे.

भाजप नगरसेवकांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत असलेले इनकमिंग व त्याचे "रिफ्लेक्शन" येत्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात नक्कीच पाहायला मिळेल असा विश्वास महाविकास आघाडीच्या मेळाव्यात आज व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.