आरोग्य कर्मचा-यांच्या आरोग्य आणि सुरेक्षेला महापालिकेचे प्राधान्य :- विजयकुमार खोराटे

0 झुंजार झेप न्युज

आरोग्य कर्मचा-यांच्या आरोग्य आणि सुरेक्षेला महापालिकेचे प्राधान्य :- विजयकुमार खोराटे   

पिंपरी चिंचवड,दि.29: शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे आरोग्य आणि सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका नेहमी प्राथमिकता देत असून वेळोवेळी त्यांच्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात, असे मत अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी व्येक्त केले.        

पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२४ होणार आहे. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आलेले आहे. त्यानुषंगाने कर्मचाऱ्यांना आरोग्य व सुरक्षेबाबत प्रशिक्षण देण्यासाठी पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे स्वच्छ्ता क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उप आयुक्त सचिन पवार, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी अंकुश झीटे, मुख्य आरोग्य निरीक्षक श्रीराम गायकवाड, सहाय्यक आरोग्य निरिक्षक शांताराम माने, शशिकांत मोरे यांच्यासह महापालिकेच्या ग, ड व ह क्षेत्रीय कार्यालयांमधील सफाई कर्मचारी उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त खोराटे म्हणाले, आरोग्य निरीक्षक व सफाई मित्र यांनी स्वच्छता करताना सुरक्षा साधनांचा वापर करावा. आरोग्याच्या चांगल्या सवयी अंगी आत्मसात कराव्यात, आरोग्याची वेळोवेळी तपासणी करावी, असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी स्वच्छ सर्वेक्षण २०२४ ची माहिती दिली आणि कामकाज चांगल्या प्रकारे व वेळेत कसे पूर्ण करावे याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात स्वच्छता मित्रांचा सन्मान अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी केले.

‘काम फाऊंडेशन’ यांच्याकडून क्षेत्रीय कार्यालय ग, ड, ह मधील मनपा, ठेकेदार व कंत्राटी सफाई कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले तसेच त्यांच्याकडून सफाई कर्मचाऱ्यांना पीपीई कीटचा वापर करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.स्वच्छ भारत अभियान "क्षमता बांधणी, कौशल्य विकास व ज्ञान व्यवस्थापन यावर मार्गदर्शन करण्यात आले.

महापालिका उप आयुक्त सचिन पवार आरोग्य विभाग यांनी कार्यक्रमांचे प्रस्ताविक करताना कर्मचाऱ्यांना जीव्हीपी कसे कमी करावे तसेच कचरा वर्गीकरण करताना सुरक्षा साधनाचा वापर कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे अजून एक वैशिष्टय म्हणचे संपूर्ण कार्यक्रम झिरो वेस्ट पद्धतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास गायकांबळे यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.