मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या नावाखाली चोर व गुंडांची भरती : सचिन काळभोर
पिंपरी चिंचवड, दि.29: पिंपरी ते निगडी मेट्रो रेल्वे प्रकल्प काम सुरू असून त्या ठिकाणी खाजगी सुरक्षा कंपनी अनंत स्काय इन्फाटेक एजंसी ह्याचा सुरक्षा ठेका रद्द करण्यात यावा पिंपरी ते निगडी मेट्रो रेल्वे प्रकल्प काम सुरू असलेल्या ठिकाणी खाजगी सुरक्षा रक्षक कंपनी कामगार गुंड प्रवृत्तीचे असून त्या खाजगी सुरक्षा रक्षक ह्यांनी निगडी येथील भक्ती शक्ती ह्या ठिकाणी मेट्रो रेल्वे प्रकल्प काम सुरू असलेल्या ठिकाणी मेट्रो प्रकल्प काम करणारे अधिकारी व कर्मचारी ह्यांना मारहाण केली होती त्या संदर्भात निगडी पोलिस स्टेशन ह्या ठिकाणी फौजदारी गुन्हा नोंद करण्यात आला होता.
त्या वेळी राजकीय दबावामुळे निगडी पोलिसांनी फौजदारी गुन्हा नोंद केला नाही मेट्रो रेल्वे प्रकल्प काम सुरू असलेल्या खाजगी सुरक्षा रक्षक ह्यांनी मेट्रो रेल्वे प्रकल्प अधिकारी व कर्मचारी ह्यांना मारहाण केली होती ते प्रकरण राजकीय दबावामुळे दाबण्यात आले निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे प्रकल्प काम सुरू असलेल्या ठिकाणी मेट्रो रेल्वे ह्यांनी खाजगी बाउन्सर ह्यांना नियुक्ती केली असून सदर बाउन्सर हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले असून त्याचे चरीत्र पडताळणी प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड शहर ह्यांच्या मार्फत घेण्यात आले.
नसून शहरातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांना बाउन्सर म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्या मुळे मेट्रो रेल्वे प्रकल्प काम सुरू असलेल्या ठिकाणी बाउन्सर मेट्रोच्या सुरक्षा नावाखाली दारू पिऊन मारहाण करणे जबरदस्तीने वाहन चालक ह्यांना रस्त्यावर अडवून लूटमार करणे तसेच मेट्रो रेल्वे साहित्य चोरी करून विल्हेवाट लावणे इत्यादी घटना मोठ्या प्रमाणावर घडत असून मेट्रो खाजगी सुरक्षा रक्षक मेट्रो रेल्वे प्रकल्प अधिकारी व कर्मचारी ह्यांना मारहाण करून दहशत निर्माण करत असून त्या संदर्भात मेट्रो रेल्वे प्रकल्प अधिकारी ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन पिंपरी ते निगडी मेट्रो रेल्वे खाजगी सुरक्षा कंपनी अनंत स्काय इन्फाटेक एजंसी सुरक्षा ठेका रद्द करण्यात यावा तसेच मेट्रो रेल्वे प्रकल्प सुरक्षा रक्षक चरीत्र पडताळणी प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल पोलिस चिंचवड शहर पोलिस आयुक्त ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन चरीत्र पडताळणी नसलेले खाजगी सुरक्षा रक्षक ह्यांना सेवा मुक्त करावे जेणेकरून मेट्रो रेल्वे प्रकल्प काम सुरू असलेल्या ठिकाणी बाउन्सर किंवा सुरक्षा रक्षक बांधा निर्माण करणार नाही ह्याची नोंद घ्यावी खाजगी सुरक्षा रक्षक कंपनी मध्ये राजकीय दबावामुळे मुळ ठेकेदार ह्यांना पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प काम सुरक्षा ठेका देण्यात आला.
असून त्या ठिकाणी मुळ ठेकेदार ह्याचे सुरक्षा रक्षक तैनात नसून त्या ठिकाणी उपठेकेदार ह्यांनी बोगस खाजगी ठेकेदार मार्फत सुरक्षा रक्षक व बाउन्सर तैनात करण्यात आले असून ते गुंड प्रवृत्तीचे व्यक्ती असून त्या संदर्भात पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प अधिकारी श्रावण हर्डीकर तसेच इतर अधिकारी ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन कारवाई करण्यात यावी हि नम्र विनंती सचिन काळभोर भारतीय जनता पार्टी चिटणीस आमदार पाठबळ देत आहे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना बाउन्सर तसेच गुंड प्रवृत्तीच्या सुरक्षा रक्षक म्हणून ठेकेदार ह्यांना त्या ठिकाणी घुसखोरी करत आहे.

