आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुषार कामठेंची पत्रकबाजी — भाजपचा हल्लाबोल

0 झुंजार झेप न्युज

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुषार कामठेंची पत्रकबाजी — भाजपचा हल्लाबोल

पिंपरी चिंचवड,दि.14 :चिखली-कुदळवाडीतील संशयास्पद कारवाई, वाकड टीडीआर घोटाळा, संशयास्पद निविदा, सुशोभीकरणाच्या नावाखालील व्यवहार — अशा गंभीर प्रकरणांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्या बदलीपूर्वी मंजूर झालेल्या भांडवली कामांची माहिती मागवल्याने नवे राजकीय वादळ उसळले आहे.


भाजपचे माजी शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी यावर जोरदार टीका करत म्हटले —


> “आयुक्त असताना तुषार कामठे गप्प बसले आणि आता निवडणुका जवळ आल्यावर पत्रकबाजी सुरू झाली आहे.”


🔸 गंभीर विषयांवर मौन, निवडणुकीत आक्रमकता?


काळभोर यांनी आरोप केला की —


मेट्रो प्रकल्पामुळे हजारो खड्ड्यांनी रस्त्यांची दुर्दशा


२४ तास पाणीपुरवठा योजनेतील विलंब


रावेत बीआरटी मार्ग बंद


आकुर्डी जलतरण तलाव बंद


धोकादायक इमारतीत नागरिकांचे स्थलांतर न होणे

या विषयांवर कामठे गप्प राहिल्याचा आरोप त्यांनी केला.


फोटोपास धारकांना पुनर्वसन क्षेत्रात सुविधा न मिळाल्याबाबतही कामठे यांनी भूमिका घेतली नाही, अशी टीकाही काळभोर यांनी केली.

🔸 पक्षातील गळतीनंतर पत्रकबाजी?

भोसरी मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटातील मोठ्या गळतीनंतर पत्रकबाजी सुरू झाल्याचा आरोपही काळभोर यांनी केला.

> “अजित गव्हाणे आणि २६ माजी नगरसेवकांनी अजित पवार गटात प्रवेश केला आणि त्यानंतर शरद पवार गटाने शहराकडे पाठ फिरवली,” असे ते म्हणाले.

🔸 संभाजी महाराज पुतळा प्रकरणातही संशय

काळभोर यांनी पुढे पुतळा प्रकरणावरही निशाणा साधला.

> “कार्यक्रमाच्या वेळी तडे गेलेल्या पुतळ्याकडे दुर्लक्ष झाले. त्यावेळी ते गप्प होते आणि आता निवडणुकीच्या तोंडावर अचानक आक्रमक झाले,” अशी टीका त्यांनी केली.

🔸 “पत्रकबाजी नव्हे – ठोस कामगिरी हवी”

> “नागरिकांना पत्रकबाजी नव्हे, ठोस कामगिरी हवी. शहरातील खऱ्या प्रश्नांवर उपाययोजना करा,”

असे आवाहन काळभोर यांनी शेवटी केले.

— सचिन काळभोर

माजी शहर चिटणीस, भारतीय जनता पक्ष, पिंपरी चिंचवड

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.