प्रभात शाळेचे विद्यार्थ्यांची पूरग्रस्तांना एक लाख 51 हजार रुपये मदत
अकोला दिनांक 15 : येथील प्रभात किड्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन पूरग्रस्त बांधवांसाठी एक लाख 51 हजार रुपये निधी गोळा केला मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ही रक्कम विद्यार्थ्यांनी आज जिल्हाधिकारी वारसा मीना यांच्याकडे सुपूर्द केली.
जिल्हाधिकारी वर्ष मीना यांनी विद्यार्थ्यांच्या या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक करून आभार मानले.
महाराष्ट्रात अलीकडे झालेला अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे या आपत्तीमध्ये अनेक संसार उध्वस्त झाले असून घरी शेती जनावरे व उपजीविकेची साधने पाहून गेले आहेत तसेच हजारो कुटुंब बेघर होऊन निवाऱ्याशिवाय राहत आहेत. ही स्थिती लक्षात घेऊन पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी ला मदत करण्याचा निर्णय या विद्यार्थ्यांनी घेतला व प्रकल्प प्रमुख म्हणून कु अपूर्वाने संपूर्ण विद्यार्थी प्रतिनिधी सबत जाऊन आज या निधींचा धनादेश जिल्हाधिकारी महोदय यांना दिला सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या या सजग सामाजिक जाणीव व कृतिशीलतमुळे सर्वांचे कौतुक केले.

