२६ वर्षांनंतर श्री भगवान विद्यालयचे माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र!
शेवगाव: दिनांक 25 ऑक्टोबर रोजी भगवान माध्यमिक विद्यालय बालमटाकळी येथे सन 1999 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
या कार्यक्रमाचे आयोजन आपले सर्व वर्गमित्र व मैत्रिणी यांच्यामार्फत करण्यात आले. यामध्ये विशेष पुढाकार अतुल शेळके, नितीन शिंदे, संभाजी घोरपडे, मल्हारी माने तोफिक पठाण, पंचक्रोशीतील सरपंच तसेच स्मिता देशमुख, व इतर मैत्रिणी यांचाही वाटा होता.
कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले राठोड सर वेदपाठक सर, खेडकर सर, हुलवळे सर, नजन सर मापारी सर, आंधळे सर ,जवरे सर यांनी कार्यक्रमाची शोभा खऱ्या अर्थाने वाढवली. तसेच भारत घोरपडे यांनी अगदी प्रोफेशनल असे बहारदार सूत्रसंचालन केले योगेश परदेशी यांनी स्वादिष्ट असे जेवण बनवले.
संपूर्ण दिवसभर जुन्या आठवणींना उजाळा देत असताना सर्व मित्र-मैत्रिणी अगदी मन मोकळेपणाने आठवणी सांगत होते.
रामेश्वर देशमुख यांनी तर कमाल केली अतिशय गोड आवाजात मैत्रीचे गीत गायन करत कार्यक्रमांमध्ये एक वेगळी ऊर्जा तयार केली त्यावेळी जवळपास 25 वर्ष पाठीमागे गेल्यासारखे वाटले. खरंच या धावपळीच्या काळामध्ये ज्यांना स्वतःसाठी द्यायला वेळ नाही असे आमचे मित्र मैत्रिणी संपूर्ण दिवसभर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.
यावेळी गुजरात पुणे मुंबई संभाजीनगर नाशिक व वेगवेगळ्या शहरांमध्ये स्थायीक झालेले सर्व वर्गमित्र मैत्रिणी आवर्जून हजर झाले. त्यांचेही विशेष आभार.
कोणताही कार्यक्रम करायचा असेल तर त्या मागची मेहनत ही दिसत नसते. जवळपास महिनाभर गावातील मित्रांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम पार पाडला त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व ग्रुपच्या वतीने सर्वांचे खूप खूप आभार शेवटी आभार व्यक्त करताना अतुल शेळके यांनी वर्गातील कुठल्याही गरीब विद्यार्थ्यांची शाळेसाठी फी वगैरे कुठलाही खर्च असेल तर अतुल शेळके हे स्वतः करतील अशी त्यांनी ग्वाही दिली व कार्यक्रम समाप्त झाला

