अमहदनगर -जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी राहुल द्विवेदी यांनी 13 नोव्हेंबर 2019 रोजी पासून 26 नोव्हेंबर 2019 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश शासकीय सेवेतील व्यक्तींना वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्य पुर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे व ज्या व्यक्तींना शारिरीक दुर्बलतेच्या कारणास्तव लाठी अगर काठी वापरणे आवश्यक आहे
लग्नकार्य, धार्मिक कार्यक्रम, प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही.

