भगसिंह कोश्यारी यांचा जन्म 1942 ला उत्तराखंडच्या कुमॉंऊ क्षेत्रातील अल्मोडा जिल्ह्यातील एका गावात झाला.
अल्मोडात शिक्षण घेतल्यानंतर आग्रा येथील विद्यापीठात इंग्रजी साहित्यात त्यांनी आचार्य ही उपाधी प्राप्त केली. राष्ट्रीय सेवा संघातही ते सक्रीय होते. त्यांनी 1977 ला लागु झालेल्या आणीबाणीलाही विरोध केला होता.
2000 मध्ये नव्याने स्थापन झालेल्या उत्तराखंड राज्यात ते उर्जा सिंचन, कायदा-न्याय मंत्री होते. 30 ऑक्टोबर 2001 ला ते मुख्यमंत्रीही झाले. परंतु 122 दिवसांतच 1 मार्च 2002 ला त्यांना निवडणुकीतील पराभवानंतर राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर विरोधी पक्षनेत्याची त्यांनी भुमिका निभावली.2007 ला भाजपचा विजय झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असताना त्यांच्याऐवजी भुवन चंद्र खंडुरी यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते.
भगतसिंह कोश्यारी उत्तराखंड विधानसभेत 2002 ते 2007 पर्यंत विरोधी पक्षनेतेही होते. त्यानंतर ते राज्यसभा सदस्यही होते. 31 ऑगस्ट 2019 ला ते महाराष्ट्राचे राज्यपाल झाले आहेत.

