मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री व्हावे अशी माझी आणि आमदारांची भावना आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार घेतील. अजित पवारांना उपमुख्यमंत्री नव्हे तर त्यापेक्षाही मोठं झालेलं मला पाहायचं आहे, असं राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक झाली. यावेळी जे काही संभ्रम निर्माण झाले होते ते आता दूर झाले आहेत. आम्ही पुढे जात आहोत. अजित पवारांनी बैठकीला मार्गदर्शन केलं, अशी माहिती तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
दादांविषयी सर्व आमदारांच्या मनात आदरभाव आहे.
- दरम्यान, अजित पवार यांनी अनपेक्षितपणे भाजपला पाठिंबा दिला होता. त्यांनतर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र, अवघ्या तीन तिवसांत या दोघांना राजीनामा द्यावा लागला होता.

