भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वेळापत्रकात बदल, जाणून घ्या कोणता सामना कुठे

0 झुंजार झेप न्युज

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेला 6 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. पण, या मालिकेच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) बुधवारी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे.
बांगलादेश मालिकेनंतर वेस्ट इंडिजचा संघ भारतात तीन वन डे आणि तीन ट्वेंटी-20 मालिका खेळण्यासाठी येणार आहे. या दौऱ्याला 6 डिसेंबर पासून ट्वेंटी-20 सामन्यानं सुरुवात होणार आहे. पहिला ट्वेंटी-20 सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार होता.
पण, मुंबई पोलिसांनी या सामन्याला सुरक्षा पुरवण्यास अडचण होईल, असे सांगितले होते. 6 डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिवस आहे आणि त्यामुळे मुंबईतील बहुतेक पोलीस त्या ड्युटीवर असणार आहे. त्यामुळे क्रिकेट सामन्याला सुरक्षा पुरवण्या इतके पोलीस मुंबई पोलिसांकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
''या मालिकेचा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार होता. पण, तो सामना हैदराबादला हलवण्यात आला आहे. येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मालिकेतील पहिला सामना होईल,''अशी माहिती बीसीसीआयचे सचिन जय शाह यांनी दिली. ते पुढे म्हणाले,''हैदराबाद येथे होणारा तिसरा सामना आता मुंबईत होईल.''
विंडीज मालिकेचे वेळापत्रक
⦁ ट्वेंटी-20 मालिका
6 डिसेंबर - हैदराबाद
8 डिसेंबर - तिरुवनंतपुरम
11 डिसेंबर - मुंबई
⦁ वन डे मालिका
15 डिसेंबर- चेन्नई
18 डिसेंबर- विशाखापट्टणम
22 डिसेंबर - कट्टक

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.