मुंबई । आज सकाळपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडमोडीनंतर राज्यात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काही आमदार फोडून भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. या शपथविधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडली आहे. पवार कुंटुंबात फुट पडल्याने आता राष्ट्रवादीच्या नेत्यांची गोची झाली आहे.
123 people are talking about this
प्रत्येक नेता आपण कोणाबरोबर आहे स्पष्ट करत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी मी मरे शरद पवारांबरोबरच असल्याचे म्हटले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, हसन मुश्रीफ यांनी पवारांबरोबर असल्याचे स्पष्ट केले आहे. यानंतर आता खासदार अमोल कोल्हे यांनी "साहेब ठरवतील ते धोरण आणि बांधतील तेच तोरण" ! असे म्हटले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते शरद पवारांबरोबर असल्याचे दिसत आहे.


