काही दिवसांपूर्वी भाजपच्या नेत्या नवनीत राणा कौर यांनी राज्याच्या सत्ता स्थापनेबद्दल भाकीत केले होते. जे आज खरे ठरले असे सांगण्यात येत आहे. ”राज्याचे नेते देवेंद्र फडणवीसचं होतील,” असे भाकीत राणा यांनी केले होते. त्यांनतर आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर अजित पवार यांनी उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
या सर्व घडामोडीवर ” मला वाटत शरद पवारचं अजित पवार यांच्या निर्णयात सामील असतील,” अशी प्रतिक्रिया राणा यांनी दिल्या आहेत. राणा यांनी यासर्व घडामोडीचा थेट शरद पवारांशी संबंध जोडल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.
आज पहाटे काही आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र देत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या घटनेने राजकीय वर्तुळात भूकंप झाल्यासारखे वातावरण होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. राज्यात सकाळ पासून सुरु असलेल्या हाय व्होल्टेज ड्रामयावर शरद पवार यांनी वाय. बी. सेंटर मध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी शिवसेनेलाच पाठींबा देणार असल्याचे स्पष्ट केले.

