'देवेंद्र फडणवीस बहुमत सिद्ध करतील असा मला विश्वास आहे' : नितीन गडकरी

0 झुंजार झेप न्युज

नवी दिल्ली : शिवसेना , राष्ट्रवादी व काँग्रेस हे महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या तयारीत असतानाच आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला.
यासर्व घडामोडींनंतर भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपण काही दिवसांपूर्वी केलेल्या विधानाची आठवण करून दिली. तसेच नव्याने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारला शुभेच्छा दिल्या.


खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले ," मी आधीच म्हणालो होतो कि क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकते. काही दिवसांपूर्वी मी बोललो होतो ' राजकारण आणि क्रिकेट ' यात काहीही अशक्य नाही. ते खरं ठरलं , राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात जे सरकार बनले ते स्थिर सरकार असेल , हे सरकार बहुमत सिद्ध करेल असा मला विश्वास आहे , माझ्या नवीन सरकारला शुभेच्छा ," असे गडकरी म्हणाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.