माजलगाव तालुक्यात परतीच्या पावसाने केंद्रीय पथकाने शनिवारी नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. डॉ. व्ही.थिरुपुगाह, सहसचिव (पी अँण्ड पी)नवी दिल्ली यांच्या नेतृत्वाखाली, डॉ. के.मनोहरन, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय यांनी शेतकरी शिवाजी रांजवन यांच्या डाळिंबाच्या बागेची झालेल्या वाताहतीची पाहणी केली.
रांजवन यांच्या सात एकर बागेचे पूर्ण नुकसान झाले. त्याची माहिती रांजवन यांनी दिली यावेळी उपविभागीय अधिकारी शोभा ठाकुर, तहसीलदार प्रतिभा गोरे, तालुका कृषी अधिकारी जनार्दन भगत, गटविकास अधिकारी बळीराम चव्हाण उपस्थित होते.

