आम्ही ८० वर्षाच्या ' योध्या' सोबत बारामतीत लागले होर्डींग

0 झुंजार झेप न्युज

बारामती : अजित पवारांच्या बंडोखोरीवर बारामतीकरांनी मात्र संयमीत प्रतिक्रिया देतशहरात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या फोटोसह 'आम्ही ८० वर्षाच्या 'योध्या' सोबत..! ' असे फलक लावले आहेत. २४ ऑक्टोबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्वात मोठी उलथापालथ राज्याच्या राजकारणात पाहायला मिळाली आहे. कोणत्याहीपक्षाने सरकार स्थापन करण्यासाठी असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
यानंतर शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या ३ पक्षांनी एकत्र येऊन ' महाविकास ' आघाडीच्या मार्फत राज्यात सत्ता स्थापन करण्याचं ठरवलं. मात्र या सर्व घडामोडींवर मात करत, शनिवारी सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादीचे बारामतीचे आमदार अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. अजित पवारांनी घेतलेल्या या निर्णयाचे राज्यात साहजिकच पडसाद पाहायला मिळाले. बारामतीमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तसेच सर्वसामान्य बारामतीकरांसाठी हा मोठा धक्का होता.

एकेकाळी सत्ता आल्यानंतर फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष होणाऱ्या बारामतीत भयान शांतता आहे.बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा समर्थनार्थ पोस्टर्स झळकली आहेत. आम्ही, ८० वर्षांच्या योद्ध्यासोबत ! असा संदेश लिहत बारामतीकरांनी शरद पवार यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. या सर्वप्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी अजित पवारांची विधीमंडळ नेतेपदावरुन हकालपट्टी केली आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.