1 डिसेंबर पासून देशात लागू होणार FASTags योजना

0 झुंजार झेप न्युज

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी 14 ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या इंडियन मोबाईल कॉंग्रेसमध्ये (Indian Mobile Congress), 'वन नेशन वन फास्टॅग' (One Nation, One Fastag) योजनेची घोषणा केली होती. 1 डिसेंबर 2019 पासून ही योजना देशभरात राबविली जाईल. ही योजना लागू झाल्यानंतर संपूर्ण देशात कोणतेही वाहन रोख पैशांच्या स्वरूपात टोल न देता कुठेही प्रवास करू शकते. सरकार कॅशलेस सिस्टमला सतत प्रोत्साहन देत आहे आणि परिवहन क्षेत्रातील फास्टॅग हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे.
'एक देश एक फास्टॅग' या विषयावर आयोजित कार्यक्रमात गडकरी म्हणाले की, सध्या राष्ट्रीय महामार्गावर एकूण 527 टोल प्लाझा आहेत, त्यापैकी 380 टोल प्लाझाच्या सर्व लेन फास्टॅगसह सुसज्ज आहेत.
उर्वरित लेन लवकरच देखील फास्टॅगसह सुसज्ज होतील. 1 डिसेंबरपासून देशातील सर्व टोल प्लाझावर अशी व्यवस्था केली जाईल. फास्टॅगची वैशिष्ट्ये सांगताना ते म्हणाले की, फास्टॅग यंत्रणा लागू झाल्यानंतर टोल प्लाझावर गर्दी होणार नाही, यामुळे लोकांचा वेळ वाचणार आहे.
पॅनकार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यांसारखे, केवायसीसाठी आवश्यक आयडी प्रूफ दिल्यानंतर तुमचे फास्टॅग अकाउंट तयार केले जाते. यासाठी पासपोर्ट आकाराचा फोटो देखील आवश्यक आहे. फास्टॅग सर्व टोल प्लाझा व काही बँकांकडून ऑनलाईन खरेदी करता येईल. फास्टॅग रिचार्ज करण्यासाठी आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, आरटीजीएस आणि नेट बँकिंगचा वापर करू शकता. आपण आपल्या फास्टॅग खात्यात किमान 100 रुपये आणि एक लाख रुपयांपर्यंत ठेवू शकता
वाहनाच्या विंडस्क्रीनमध्ये फास्टॅग बसविला जातो. हे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) ने सुसज्ज आहे. आपले वाहन टोल प्लाझावर पोहोचताच, सेन्सरला स्क्रीनवरील फास्टॅग जाणवेल आणि आपल्या खात्यातून टोलचे पैसे वजा केले जातील. अशाप्रकारे टोलसाठी तुम्हाला रोख पैसे देण्याची गरज भासणार नाही.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.