संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा व कार्तिकी यात्रेनिमित्त १८ ते २६ नोव्हेंबर या कालावधीमध्ये आळंदी येथे भाविक येणार आहेत. त्यामुळे वाहतुकीत बदल केला आहे.
बंद ठेवण्यात येणारे रस्ते - पुणे- आळंदी रस्ता दिघी ते मॅक्झीन चौक, मोशी- आळंदी रस्ता डुडुळगाव जकात नाक्यापर्यंत, चाकण- आळंदी रस्ता कारवा धर्मशाळा, वडगाव घेणंद- आळंदी रस्ता विश्रांवाडी, मरकळ- आळंदी रस्ता पीसीएस कंपनी फाट्यापर्यंत. पर्यायी मार्ग - पुणे- दिघी मॅक्झीन चौक- भोसरी- मोशी- चाकण, मोशी- चाकण- शिक्रापूर, मोशी- भोसरी- मॅक्झीन चौक- दिघी, चाकण- मोशी- मॅक्झीन चौक- दिघी- पुणे, चाकण- पिंपळगाव फाटा- मरकळ- लोणीकंद, वडगाव घेणंद- पिंपळगाव फाटा- चाकण- नाशिक महामार्ग, मरकळ- सोळू- धानोरे- चऱ्होली खुर्द बाह्यवळण रस्ता, मरकळ- कोयाळी- वडगाव घेणंद- पिंपळगाव फाटा- चाकण, चिंबळी- मोशी- भोसरी- मॅक्झीन चौक- दिघी- पुणे.

