पिंपरी (zunjarzep. In):- पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. आज (दि.०५) सकाळी आलेल्या अहवालात दिड महिन्यांच्या मुलीसह ८ जणांचे रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलल्या माहितीनुसार तळवडे, रूपीनगर, संभाजीनगर, जुनी सांगवी तसेच शिवाजीनगर पुणे परिसरातील रूग्ण बाधित आढळले आहेत.
शहरातील तळवडे, रूपीनगर, संभाजीनगर, जुनी सांगवी परिसरात ‘पॉझिटिव्ह’ आढळल्याने चिंता वाढली आहे. आज ८ जणांचे रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. त्यामध्ये दिड महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. तसेच वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या पुण्यातील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या एका महिलेचे रिपोर्ट देखील ‘पॉझिटीव्ह’ आले आहे. यामुळे कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचा आकडा ६३ वर पोहचला आहे. तर, शहरातील आजपर्यंतच्या कोरोनाबाधित रूग्णांची संख्या १३२ वर पोचली आहे. तर आतापर्यंत एकूण ५५ जण कोरोनामुक्त झाले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
महापालिकेने सोमवारी (दि.४) ११५ कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते. त्याचे काही रिपोर्ट आज आले आहेत. त्यामध्ये आठ जणांचे रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. त्यात (४, ११, २२,३९, ६१, ७४) वर्षाच्या पुरुषांचा समावेश आहे. तर दिड महिन्यांच्या मुलीसह ३७ वर्षीय महिला ही कोरोनाबाधित आढळली आहे. तर पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील ७५ वर्षीय महिलेचे रिपोर्टही ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत.

