इस्लामाबाद : वृत्तसंस्था - इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पाकिस्तानच्या खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली. सोमवारी पाकिस्तान संघातील तीन खेळाडूंना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यात आणखी सात खेळाडूंची भर पडली असून पाकिस्तान संघातील 10 खेळाडूसह एकूण 35 (सपोर्ट स्टाफ) सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने मंगळवारी याची महिती जाहीर केली आहे.
पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक याला या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पत्नी सानिया मिर्झाला भेटण्याची मुभा देण्यात आली आहे.
यामध्ये अबीद अली, असद शफीक, अझर अली, बाबर आझम, फकीम अश्रफ, फवाद आलम, इफ्तिकार अहमद, इमाम उल-हक, खुशदील शाही, मोहम्मद अब्बास, नासीम शाह, सर्फराज अहमद, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, सोहैल खान आणि यासीर शाह यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.



