इंडियन मेडिकल काउन्सिल तर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात एकूण 71 लाख 37 हजार 716 कोरोना चाचण्या पार पडल्या आहेत.
यामध्ये गेल्या 24 तासात 1 लाख 87 हजार 223 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या होत्या.
यात म्हणजे 71 लाखापैकी केवळ 4 लाख 40 हजार 215 चाचण्या या आजपर्यंत पॉझिटिव्ह आल्या आहेत.
दरम्यान यातील सुद्धा 1 लाख 78 हजार 14 जण हे अॅक्टीव्ह रुग्ण असुन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर 2 लाख 48 हजार 190 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.
देशातील कोरोना मृतांचा आकडा सध्या 14011 वर पोहचला आहे.

