मुंबईत एकाच दिवसात 846 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 42 जणांचा मृत्यू झाला आहे.
तर एकाच दिवसांत 457 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे एकूण कोरोनामुक्त होणार्यांची संख्या 34 हजार 576 झाली आहे.
मुंबईत 42 मृत्यूंसह प्रलंबित 65 मृत्यूंचे रिपोर्ट आल्यामुळे एकूण मृतांची संख्या 3842 झाली असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रलंबित मृत्यू रिपोर्टसह नोंद झालेल्या 107 मृत्यूंमध्ये 64 पुरुष आणि 43 रुग्ण महिला असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 68 हजार 481 झाली असून 30 हजार 63 अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य खात्याकडून देण्यात आली आहे.

