शेतकऱ्यांना पीक कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार असल्याचा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.
सध्या राज्यात पेरणीला सुरूवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जाची आवश्यकता भासत आहे.
राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना कर्ज मिळून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी सरकारने विशेष आदेश निर्गमित केले आहेत.
परंतु, असं असतानादेखील अनेक राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.
ही बाब अतिशय गंभीर असून ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देणार नाहीत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
