जिल्ह्यातील वाई तालुक्यात ग्राम बीजोत्पादन अंतर्गत उत्पादित सोयाबीन बियाणे पेरणी केलेले उडतारे गावचे सुनील शंकर जगताप या शेतकऱ्याच्या प्लॉटला कृषिमंत्री, खा. श्रीनिवास पाटील, आमदार महेश शिंदे यांनी भेट दिली.
यावेळी टोकण पद्धतीने सरीवर सोयाबीन पेरणी केल्याने एकरी फक्त 15 किलो बियाणे लागत असल्याने उत्पादन खर्चात बचत झाल्याचे शेतकऱ्याने सांगितले. तसेच या पद्धतीने एकरी उत्पादन 20 क्विंटल घेतल्याचे सांगितले.
यावेळी सोयाबीन पिकाची उगवण 100 टक्के झालेली असल्याने कृषीमंत्री यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक दशरथ तांभाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी जयवंत कवडे, तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ, शेतकरी उपस्थित होते.

