'कंगनापासून दूर राहा', गृहमंत्री अनिल देशमुख यांना हिमाचल प्रदेशमधून धमकीचे 9 फोन
अभिनेत्री कंगना रनौत प्रकरणावरुन महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना हिमाचल प्रदेशमधून सातत्याने धमकीचे फोन येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत प्रकरणावरुन अनिल देशमुख यांना हिमाचल प्रदेशमधून सातत्याने धमकीचे फोन येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे (Threatening phone call to Anil Deshmukh in Kangana Drugs Case). मंगळवारी (8 सप्टेंबर) ‘कंगनापासून दूर राहा, तुम्ही चुकीचं केलंय, आतातरी सुधारणा करा’ अशी धमकी देणारे जवळपास 7 फोन आले. त्यानंतर आज (9 सप्टेंबर) पहाटे देखील 2 धमकीचे फोन आले. अशाप्रकारे आतापर्यंत गृहमंत्र्यांना या प्रकरणी 9 धमकीचे फोन आलेत. हे फोन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरुन येत आहेत. या धमक्यांनंतर मुंबई पोलिसांनी तातडीने तपास करण्यास सुरुवात केली आहे.
अनिल देशमुख यांना कंगना प्रकरणावरुन धमकीचं सत्र सुरु झालं आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तींनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कंगना रनौतपासून दूर राहण्यास सांगतानाच तिच्याविरोधातील कारवाई थांबवण्याचाही सूचक इशारा दिला आहे. आम्ही जे सांगतो आहे ते आत्ताच लक्षात घ्या आणि सुधरा नाही तर याचे परिणाम वाईट होतील असंही या धमकीच्या फोनमध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी धमकी देणाऱ्यांचा तपास करण्यास सुरुवात केली आहे.
#zunjarzepnews #zunjarzepofficial
Follow us on :-
#AnilDeshmukh #KanganaRanaut #ThreatCall

