राज्यपाल नियुक्त सदस्यत्वासाठी सदाभाऊ खोत यांनी सुचवली 12 नावं

0 झुंजार झेप न्युज

 

राज्यपाल नियुक्त सदस्यत्वासाठी सदाभाऊ खोत यांनी सुचवली 12 नावं

सदाभाऊ खोत यांनी सुचवलेल्या यादीत अभिनेता मकरंद अनासापुरे, झहीर खान, मंगलाताई बनसोडे, निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची नावं आहेत.


मुंबई : विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी महाविकास आघाडीकडून 12 नावांची शिफारस राज्यापालांकडे करण्यात आली आहे. मात्र यावर अद्याप कोणाताही निर्णय झालेला नाही. आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राज्यपालांकडे बारा जणांची यादी सोपवली आहे. या 12 नावांचा नावांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी विनंती सदाभाऊ खोत यांनी राज्यपालांना केली आहे. यादीत अभिनेता मकरंद अनासापुरे, झहीर खान, मंगलाताई बनसोडे, निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची नावं आहेत.


सदाभाऊ खोत यांनी सुचवलेली 12 नावे

  1. मकरंद अनासपुरे (कलाकार, सामाजिक कार्यकर्ते)
  2. डॉ. प्रकाश आमटे (सामाजिक कार्यकर्ते)
  3. डॉ. तात्याराव लहाने (आरोग्य क्षेत्र)
  4. निवृत्तीमहाराज इंदोरीकर (कीर्तनकार)
  5. झहीर खान (खेळ)
  6. अमर हबीब (सामाजिक कार्य)
  7. पोपटराव पवार (सामाजिक कार्य)
  8. विठ्ठल वाघ (साहित्यिक)
  9. विश्वास पाटील ( साहित्यिक)
  10. सत्यपाल महाराज (सामाजिक कार्य)
  11. बुधाजीराव मुळीक (कृषी)
  12. मंगलाताई बनसोडे (कला)

सदाभाऊ खोत यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे इतर समस्यांबाबतही काही मागण्या केल्या आहेत. वाढीव वीजबील माफी द्यावी, ओला दुष्काळ आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत, कोविड काळातमध्ये अत्यावश्यक सेवेदरम्यान मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत अशा मागण्या सदाभाऊ खोत यांनी केल्या.


महाविकास आघाडीकडूने देण्यात आलेली 12 नावे


राष्ट्रवादी काँग्रेस


एकनाथ खडसे (समाजसेवा आणि सहकार) 
राजू शेट्टी (सहकार आणि समाजसेवा) 
यशपाल भिंगे (साहित्य) 
आनंद शिंदे (कला)


काँग्रेस


रजनी पाटील (समाजसेवा आणि सहकार) 
सचिन सावंत (समाजसेवा आणि सहकार)
मुझफ्फर हुसेन (समाजसेवा) 
अनिरुद्ध वनकर (कला)


शिवसेना


उर्मिला मातोंडकर (कला)
नितीन बानगुडे पाटील 
विजय करंजकर 
चंद्रकांत रघुवंशी

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.