New Corona Guidelines : कोरोनाबाबत सरकारकडून नवीन गाईडलाईन्स; कंटेन्मेंट झोनमध्ये निर्बंध वाढणार

0 झुंजार झेप न्युज

 

New Corona Guidelines : कोरोनाबाबत सरकारकडून नवीन गाईडलाईन्स; कंटेन्मेंट झोनमध्ये निर्बंध वाढणार


नवी दिल्ली :  देशात अनेक राज्यांमध्ये पुन्हा कोरोना संसर्गाचा वेगाने प्रसार होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने कंटेन्मेंट, सर्व्हेक्षण आणि दक्षता यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार राज्य व केंद्रशासित प्रदेशांना कंटेन्मेंट झोनमध्ये नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. या मार्गदर्शक सूचना 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2020 दरम्यान लागू असणार असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले आहे.


याव्यतिरिक्त, इतर विविध कामांसाठीही नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये फक्त आवश्यक कामांना परवानगी देण्यात येईल असे गृह मंत्रालयाने सांगितले. कंटेन्मेंट झोनमध्ये नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिक जिल्हा, पोलीस आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांची असणार आहे. याव्यतिरिक्त, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश संबंधित अधिकाऱ्यांसोबत जबाबदारी निश्चित करतील.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.